Whatsapp समोर Signal app चे मोठं आव्हान, भारतात वापरकर्ते वाढले

 Whatsapp समोर Signal app चे मोठं आव्हान, भारतात वापरकर्ते वाढले



मुंबई : प्रायव्हसी पॉलिसी बदलल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सएपला चांगला फटका बसला आहे. प्रायव्हसीच्या नव्या फंद्यामुळे यूझर्सनी सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. या क्रॉस-प्लॅटफॉर्म एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस सिग्नल अॅपने भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. सध्या सगळ्यात जास्त सिग्नल हा अॅप डाऊनलोड करण्यात येत आहे.

शनिवारी सिग्नलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत भारतात व्हॉट्सअ‍ॅपला मागे सारत सिग्लनने पहिलं स्थान मिळावल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. फक्त भारतातच नाही तर जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँगकाँग, स्वित्झर्लंडमध्येही सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्समध्ये हा अव्वल स्थानावर आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post