लग्नाच्या जेवणातून विषबाधा, राहुरी तालुक्यातील घटना
राहुरी :प्रतिनिधी अनिल कोळसेसह नंदकुमार सिरसाट राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे लग्न समारंभात तब्बल 200 ते300 जणांना जेवणातुन विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
बाधित रुग्णांना राहुरी कारखाना येथिल नर्सिग होम, प्रवरा हाॅस्पिटल लोणी, राहुरी ग्रामिण रुग्णालय,राहुरीतील लहान मुलांचे डाॅ,प्रकाश पवार,डाॅ नेहे,डाॅ वने,डाॅ म्हस्के तसेच डाॅ संदिप कुसळकर अदि डाॅक्टरांनी बाधित रुग्णावर उपचार केले.
टाकळीमिया येथे कडस्कर व काळे यांचा शुभविवाह होता यामधे विवाह लागल्यानंतर जेवण करत असतांना अचानक अनेकांना उलटी ,मळमळ,चक्कर येवुन अनेक जण जमिनीवर कोसळले. काहींनी रुग्ण वाहिकेस संपर्क केला. रुग्णवाहिकेचे डाॅ रणसिग,चालक लक्ष्मण काळे, यांना पाचारण करत विविध रुग्णांलयात दाखल करण्यास आले.
यावेळी नर्सिग होमचे वैद्यकीय अधिकारी डाॅ लहारे डाॅ कड,डाॅ वाघमारे, अक्षय निकम, एम डी स्टॅप सिस्टर जर्हाड सरोदे,डाॅ,अश्विन दिघोरे,अक्षय कस्तुरवार, प्रतिक शवंते,कार्तिकी आघाव, स्नेहल घाडगे,शिवानी लव्हाळे,काजल मोडवे, रुचिका भागवत, प्रिया बोधले, वाॅचमन अश्पाक सय्यद, विजय गवळी, भगवान कोबरणे,प्रविण बारहाते अदिंनी मदत केले.
यावेळी लहान मुले व वृध्दांचा या विवाह समारंभात अधिक सहभाग होता.
Post a Comment