शिवसेना नगरसेवकाने केले खा.सुजय विखेंचे ‘सारथ्य’, राजकीय वर्तुळात चर्चा

 


शिवसेना नगरसेवकाने केले खा.सुजय विखेंचे ‘सारथ्य’, राजकीय वर्तुळात चर्चानगर : नगर शहरातील राजकीय गणिते समजणे अनेकांना कठिण जाते. सध्या शहरात उड्डाणपुलाचे काम सुरु असून खा.डॉ.सुजय विखे हे या कामावर बारीक लक्ष ठेवून आहेत. नुकतीच त्यांनी उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी खासदार विखे यांनी मोठ्या चार चाकीत फिरण्याऐवजी दुचाकीवर बसून उड्डाणपूलाच्या मार्गावर पाहणी केली. यावेळी त्यांचे सारथ्य केले ते शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी. गाडे यांच्या दुचाकीवर मागे बसून खासदारांनी उड्डाणपूलाचे काम पाहिले तसेच या कामासाठी पाईपलाईन स्थलांतरण, गटारींची कामे तसेच उर्वरित भूसंपादनाबाबत अधिकार्‍यांना निर्देश दिले. या पाहणी दौर्‍याचे फोटोही खा.विखे यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत.या संपूर्ण पाहणी दौर्‍यात नगरसेवक गाडे विखेंसमवेत होते. लोकसभा निवडणुकीला शिवसेनेने युती असल्याने भाजपला पर्यायाने विखेंना मोठी साथ दिली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र विखे व शिवसेनेत अंतर पडल्याचे पहायला मिळाले. मात्र आता शिवसेनेचे नगरसेवक गाडे आणि खा.विखेंची ही जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे शहरात भाजपचेही नगरसेवक असून महापौर, उपमहापौरही भाजपचेच आहेत. असे असताना विखेंच्या दुचाकीचे सारथ्य शिवसेनेच्या नगरसेवकाने केल्याने राजकीय वर्तुळात या वेगळ्या समीकरणाची चर्चा रंगली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post