याला म्हणतात ‘बाजीगर’...पराभूत उमेदवाराने मानले ‘त्या’ 12 मतदारांचे आभार

 याला म्हणतात ‘बाजीगर’...पराभूत उमेदवाराने मानले ‘त्या’ 12 मतदारांचे आभारलातूर : ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकालानंतर विजयी सदस्यांच्या अभिनंदनाचे मोठमोठे बॅनर लागलेले गावोगावी दिसतील. पण लातून जिल्ह्यातील एका युवा उमेदवाराने पराभवही खुल्या दिल्याने स्विकारला. या युवकाला फक्त 12 मते पडली पण त्याने या बारा मतदारांचे आभार मानण्यासाठी बारा फूटी बॅनर लावला. विकास शिंदे असे या पराभूत उमेदवाराचे नाव असून त्याने लावलेल्या डिजीटल फलकाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.  पराभूत उमेदवार विकास शिंदे याला ग्रामपंचायत निवडणुकीत अवघी 12 मते मिळाली. 


‘‘वाटलं होतं गड्या आपला गाव बरा... पण तुम्ही म्हणाला पसारा भरा.. आम्ही जातो आमच्या गावा... आमचा राम राम घ्यावा, समाजानं धिकारलं...गावानं नाकारलं...पण आम्हाला देश स्विकारणार..! आमच्यावर जिवापाड प्रेम करणा-या बारा मतदरांचे जाहीर आभार.. ना जातीसाठी.. ना धर्मासाठी.. आमचा लढा मातीसाठी... जगेन तर देशासाठी.. मरेन तर देशासाठी.. मला ज्यांनी बारा मते देऊन संघर्ष करण्याची ताकद दिली त्यांचे सात जन्म उपकार फिटणार नाहीत. तुमच्या मताच देशात नाव करेन. खंडेराया नगराचे पराभूत उमेदवार विकास शिंदे कोनाळीकर.’’ अशा शब्दात विकासने मतदारांचे आभार मानलेत.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post