लस घेतल्यानंतर जिल्ह्यातील चौघांना त्रास पण.... Video

 

लस घेतल्यानंतर जिल्ह्यातील चौघांना त्रास पण.... काळजीचे कारण नाही, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची माहितीनगर : नगर जिल्ह्यात करोना लसीकरण सुरू झाले असून पहिल्या दिवशी ८७१ जणांना लस देण्यात आली. त्यातील चौघांना लस घेतल्यानंतर त्रास जाणवू लागला. यात महिला परिचारिकांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. या चौघांना लस घेतल्यानंतर ताप येणे, मळमळणे अशा प्रकारची लक्षणे आढळुन आली असून त्यांना जिल्हा रुग्णालयात आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र या सगळ्यांची प्रकृती स्थिर असून जिल्हा रुग्णालयात फक्त आयसीयुत नॉन कोविड रूग्णांची व्यवस्था असल्याने त्या रूग्णांना तिथे ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ‌ त्यांची प्रकृती गंभीर आहे, असं काही नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

Video

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post