होंडा युनिकॉर्न खरेदीवर ‘इतक्या’ हजारांच्या कॅशबॅकची ऑफर

होंडा युनिकॉर्न खरेदीवर 5 हजारांच्या कॅशबॅकची ऑफर   नवी दिल्लीः होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपल्या अनेक दुचाकीवर खास ऑफरची घोषणा केली आहे. यात होंडा एसपी 125, हॉर्नेट 2.0, अॅक्टिवा 6जी, सीडी 110 ड्रीम आणि ग्राज़िया 125 चा समावेश आहे. आता होंडा टूव्हीलरने युनिकॉर्न १६० मोटरसायकलवर सुद्धा ५ हजारांची कॅशबॅक ऑफर देण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर केवळ त्याच ग्राहकांना मिळणार आहे जे ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून पेमेंट करतील. तसेच ऑनलाइन बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सुद्धा हा फायदा मिळणार आहे. आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा , येस बँक, स्टँडर्ड चार्टर्ड आणि फेडरल बँकचा यात समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post