पादचार्‍यांना लुटणार्‍या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

 पादचार्‍यांना लुटणार्‍या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी



नगर : रस्त्याने पायी जाणार्‍या पादचार्‍यांना लुटणार्‍या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले आहे. पंकज राजू माचरेकर आणि शाबीर दिलावर शेख अशी या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी दि.2 नोव्हेंबर 2020 रोजी श्रीरामपूरातील रेल्वे भुयारी पुलाखालून पायी जाणार्‍या शेजल सुनिल चित्ते यांना अडवून त्यांच्या हातातील मोबाईल चारुन नेला होता. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलिस कर्मचारी भाउसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, शंकर चौधरी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, प्रकाश वाघ, राहुल सोळुंके, रवींद्र घुंगासे, बबन बेरड यांच्या पथकाने श्रीरामपूरातून आरोपींना ताब्यात घेतलं. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post