खा.डॉ.सुजय विखेंसह संचालक राजीनामा देण्याच्या मनस्थितीत

 खा.डॉ.सुजय विखेंसह संचालक राजीनामा देण्याच्या मनस्थितीत

डॉ.तनपुरे साखर कारखान्यातील रोजच्या कटकटींना वैतागले संचालकनगर : खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या ताब्यात असलेल्या राहुरी येथील डॉ. तनपुरे कारखान्याच्या गाळप हंगामात तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने सतत बाधा येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून अडचणीत आलेला कारखाना सत्ताधारी संचालक मंडळाने चालू केलाय. परंतू, गेल्या काही दिवसांत कारखान्याच्या गाळपात अडचणी येत आहेत. त्यामुळे खा.डॉ.विखे हेही वैतागले असून त्यांच्यासह सहा संचालक राजीनामा देण्याच्या तयारी असल्याचे सांगितले जात आहे.  पुढील बहात्तर तास नैसर्गिक आपत्ती वगळता हा कारखाना सुरळीत चालला नाही तर पत्रकार परिषद घेऊन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह तनपुरे कारखान्याचे संपूर्ण संचालक मंडळ राजीनामा देईल असा इशारा आज संचालक मंडळ ,अधिकारी व कामगार यांच्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते देण्यात आला आहे.

मोठा खर्च करूनही सुरळीत चालत नाही याबाबत या बैठकीत तीव्र खेद आणि नाराजी व्यक्त करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर विखे पाटील यांच्यासह चेअरमन नामदेव ढोकणे, माजी चेअरमन उदयसिंह पाटील ,माजी व्हा चेअरमन श्यामकाका निमसे ,व्हा चेअरमन दत्ता पाटील यांची कारखान्याचे संचालक, अधिकारीख् कामगार यांच्यासमवेत संयुक्त बैठक झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post