भयंकर अपघात...फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना ट्रकनं चिरडलं, 15 ठार

फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना ट्रकनं चिरडलं, 15 ठारसूरत : सोमवारी रात्री गुजरातच्या सूरतमध्ये एक भयंकर अपघात घडल्याचं समोर येतंय. अर्ध्या रात्री फुटपाथवर झोपलेल्या लोकांना एका अनियंत्रित झालेल्या एका ट्रकनं चिरडल्यानं हा अपघात घडला. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या सूरत स्थित किम रोडच्या फुटपाथवर हा अपघात घडला. या फुटपाथवर जवळपास १८ जण गाढ झोपलेले होते. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या ट्रकसमोर अचानक एक वाहन आलं. त्यामुळे ट्रक चालकाचा स्टिअरिंगवरचा ताबा सुटला आणि हा ट्रक फुटपाथवर चढला.  जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post