WhatsApp ने पहिल्यांदाच ठेवलं स्वत:चं स्टेटस, लोकांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमधील बदलांबाबत चर्चेत आहे. व्हॉट्सअॅपने युजर्सला नवी पॉलिसी अॅक्सेप्ट करण्यास 8 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला होता. परंतु युजर्सच्या अनेक प्रतिक्रियांनंतर, कंपनीने ही पॉलिसी सध्या स्थगित केली आहे. युजर्स या पॉलिसीमुळे इतर सुरक्षित ऍप्सकडे वळले. व्हॉट्सअॅपकडून ब्लॉगद्वारे, ट्विट करून आणि आता पहिल्यांदाच व्हॉट्सअॅपने स्वत:चं स्टेटस ठेऊन लोकांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत, स्पष्टीकरण दिलं आहे.
व्हॉट्सअॅपने स्टेटसमध्ये कॉलिंग, प्रायव्हेट मेसेज आणि कॉन्टॅक्ट्ससारख्या गोष्टींवर स्पष्टीकरण दिलं आहे. व्हॉट्सअॅपने एकूण 4 स्टेटस ठेवले आहेत. पहिल्या स्टेटसमध्ये व्हॉट्सअॅप युजर्सच्या गोपनीयतेसाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलं आहे. दुसऱ्या स्टेटसमध्ये व्हॉट्सअॅप युजर्सच्या पर्सनल चॅटचा रेकॉर्ड ठेवत नसून, हे चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असल्याने लोकांचं बोलणं ऐकत नसल्याचं सांगितलं आहे. व्हॉट्सअॅपने ट्विट करुनही याबाबत माहिती दिली आहे. ग्रुप इनवाईटबाबत व्हॉट्सअॅपने सांगितलं की, नव्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये युजर्सचे व्हॉट्सअॅप ग्रुप्स प्रायव्हेटच राहतील.
WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे अनेक युजर्समध्ये नाजारीचं, संभ्रमाचं वातावरण आहे. व्हॉट्सअॅपची नवी पॉलिसी सर्व युजर्सना ऍक्सेप्ट करावी लागणार आहे. सध्या कंपनीने या प्रायव्हसी पॉलिसीला स्थगिती दिली आहे. मात्र, आपली खासगी माहिती, चॅट शेअर होण्याच्या भीतीने अनेकांनी WhatsApp ला इतर पर्याय शोधले आहेत. WhatsApp ने याचं खंडन करतं, प्रायव्हेट चॅट शेअर होणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
Post a Comment