शिवसेनेकडून भाजपला दे धक्का, दोन मातब्बर नेत्यांनी बांधले शिवबंधन

 शिवसेनेकडून भाजपला दे धक्का, दोन मातब्बर नेत्यांनी बांधले शिवबंधननाशिक : पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व सध्या भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते व सुनील बागूल यांनी आज घरवापसी केली आहे.. त्यामुळं शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. खा.संजय राऊत यांनी गिते व बागूल यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करीत त्यांचे स्वागत केले. वारे बदलत असून नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post