शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड जाहीर, ‘यांना’ मिळाली संधी

 शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड जाहीरनगर : जागतिक किर्तीचे धार्मिक स्थळ असलेल्या शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवत सोपान बानकर यांची तर उपाध्यक्षपदी विकास नानासाहेब बानकर यांची निवड करण्यात आली आहे. मागील महिन्यात नवीन विश्वस्तांची निवड जाहीर केली होती. माजी सरचिटणीस दिपक दरंदले यांनी बोलविलेल्या बैठकीत अध्यक्ष बानकर यांच्या नावाची सुचना अप्पासाहेब शेटे यांनी केली. त्यास विकास बानकर यांनी अनुमोदन दिले. इतर कोषाध्यक्षपदी दिपक दादासाहेब दरंदले, सरचिटणीस बाळासाहेब बोरुडे, चिटणीस अप्पासाहेब शेटे यांची निवड झाली आहे. नूतन पदाधिकार्‍यांचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post