स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट

अनोळखी लिंकवर क्लिक करू नये,  स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना अलर्टकोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणं किती महागात पडू शकतं याची प्रचिती काही जणांना आली असेल. इतकंच काय तर अनोळखी लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं खातही पूर्णपणे रिकामं होऊ शकतं.स्टेट बँकेनं देशातील आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट केलं आहे. तसंच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहनही केलं आहे. असं केल्यास तुम्ही आपल्या मेहनतीची कमाईदेखील गमावू शकता.


बँकेनं आपल्या ग्राहकांना त्वरित कर्ज देणाऱ्या अॅप पासून सावध राहण्यास सांगितलं आहे. तसंच घाईघडबडीत कर्ज घेणं धोकादायक ठरू शकतं असंही म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यापूर्वी नियम आणि अटी पूर्णपणे वाचल्या पाहिजेत. तसंच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसंच अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यताही पडताळून पाहा. तसंच कोणत्याही आर्थिक मदतीसाठी  https://bank.sbi यावर जाऊन मदत घेण्याचं आवाहनही बँकेनं केलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post