SBI कडून होम लोन वरील व्याजदरात कपात
नवी दिल्ली : तुम्ही देखील घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याहून चांगली संधी तुम्हाला मिळणार नाही. देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँकऑफ इंडिया कमी व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. SBI ने शुक्रवारी गृहकर्जावरील व्याज दर 0.30 टक्क्यांनी कमी करण्याची आणि प्रोसेसिंग फी पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे.
महिला कर्जदारांना मिळेल अतिरिक्त सूटबँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की गृह कर्जावरील नवीन व्याज दर सिबिल स्कोअरशी जोडले गेले आहेत आणि 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 6.80 टक्के दराने सुरू झाले आहेत. तर 30 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे व्याज दर 6.95 टक्के आहे. बँकेने असे म्हटले आहे की, महिला कर्जदारांना गृहकर्जावरील व्याजावर 0.05 टक्के अतिरिक्त सूट देखील मिळेल.
Post a Comment