रुढी-परंपरेला छेद देत विधवा भावजय बरोबर दीराची सप्तपदी

 नेवासा तालुक्यातील वडाळाबहिरोबा येथे  रुढी-परंपरेला छेद देत विधवा भावजय बरोबर दीराची सप्तपदी 


.हिंदू समाजात वर्षानुवर्षे असलेल्या रुढी-परंपरा ओलांडून वडाळा बहिरोबा(ता.नेवासा) येथे विधवा भावजयी बरोबर लहान दीराचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला.या मोठ्या मनाने घेतलेल्या उपक्रमास उपस्थित व-हाडी व नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत नवदांपत्याचे कौतुक केले आहे. 

.वडाळाबहिरोबा विधवा सुनेच्या आयुष्यात पतीच्या अपघाती निधनाने आयुष्याचा काळोख दाटला होता.या काळोखाला पुर्नविवाहाच्या निमित्ताने सासरे संजय मोटे यांनी वडीलांची भुमिका साकारत समाजाला दिशादर्शक ठरेल असा उपक्रम राबविला आहे. सामाजिक कार्यकर्ते चांगदेव मोटे व दत्तात्रेय मोटे यांची मध्यस्थी यशस्वी झाली आहे.      संजय मोटे यांचा अभियंता असलेला मोठा मुलगा महेशचे दोन वर्षांपूर्वी गावातच अपघाती निधन झाले.त्याची पत्नी प्राजंली सात महिन्याच्या बाळासह पोरकी झाली.प्राजंलीचे वडील बाळासाहेब गव्हाणे व परीवार मोठ्या दुःखात पडले. सासरे संजय मोटे यांनी वडीलकीची भुमिका करत विधवा सुनेचा विवाह लहान मुलगा अभियंता महेंद्र बरोबर निश्चित केला होता.आज विधवा भावजयी बरोबर लहान दीराचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post