राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश


राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेशमुंबई :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजपूत यांच्यासह हिंगोली जिल्ह्याचे रा.स.प. नेते कोंडिबा म्हस्के, वाशिम जिल्ह्यातील धनगर समाजाचे ज्ञानेश्वर मुखमाले तसेच विश्व भंडारी समाजाचे संस्थापक जयंत पाटकर, रा. स. प. कोकण संपर्क प्रमुख शैलेश पांजरी,रा.स.प. नेते सुमित जाधव यांनी पक्षात प्रवेश झाला. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post