दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, कोतवाली पोलिसांची कारवाई

 दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, कोतवाली पोलिसांची कारवाई.                                          अहमदनगर (प्रतिनिधी)- दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या पाच सराईत गुन्हेगारांना बुधवारी पहाटे कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले शहरातील कायनेटिक चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन जण पळून गेले समीर खाजा शेख(रा. झरेकर गल्ली नगर), विशाल राजेंद्र भंडारी (रा. चिपाडेमळा नगर), परवेज महमूद सय्यद (रा.भोसले आखाडा नगर), प्रतीक अर्जुन गजे (रा. सारसनगर), अमोल संजय चांदणे (रा.चिपाडेमळा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी दोन मोटारसायकली, लोखंडी रॉड 4 मोबाईल, मिरचीपूड, कोयता असा मुद्देमाल जप्त केला अटक केलेल्या शेख व सय्यद यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील पोलीस उपअधीक्षक विशाल डुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार, मनोज कचरे, पोना रवींद्र टकले, शाहिद शेख, तानाजी पवार, प्रमोद लहारे, गणेश धोत्रे, विष्णू भागवत, नितीन शिंदे, भारत इंगळे, सुशील वाघेला, विजय हिवाळे, सोमनाथ राऊत, कैलास शिरसाट आदींच्या पथकाने ही कारवाई केली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post