सरपंच आरक्षण जाहीर पण उमेदवारच नाही, दोन ग्रामपंचायतीत पेच

 


सरपंच आरक्षण जाहीर पण उमेदवारच नाही, दोन ग्रामपंचायतीत पेचकर्जत : कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. यात चिलवडी व पिंपळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची सरपंचपदे अनुसूचित जाती महिला राखीव निघाली आहेत. मात्र तेथे या आरक्षणाचा प्रभाग आरक्षित नव्हता. त्यामुळे सरपंचपदासाठी कोणीही उपलब्ध नाही. यामुळे येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. ज्यासाठी गावकर्‍यांनी एवढा अट्टहास केला, ते पद रिक्त राहणार असल्याने, या दोन्ही गावांतील पॅनल प्रमुखांनी खंत व्यक्त केली.  तालुक्यातील 91 ग्रामपंचायतींचे आगामी पाच वर्षांसाठीचे सरपंचपदाचे आरक्षण येथे सोडतीने काढण्यात आले. प्रांताधिकारी अर्चना नष्टे व तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी आरक्षण जाहीर केले. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post