ऐकावे ते नवलच...चक्क लाल मुंग्यांची चटणी ठरू शकते करोनावर प्रभावी इलाज

 ऐकावे ते नवलच...चक्क लाल मुंग्यांची चटणी ठरू शकते करोनावर प्रभावी इलाजनवी दिल्ली : देशातील ओडिशा आणि छत्तीसगडमधील आदिवासी बांधव खात असलेली लाल मुंग्यांची चटणी कोरोनाला अटकाव करणारी ठरू शकते. या चटणीला लवकरच कोरोना विषाणूविरोधातील प्रभावी औषध म्हणून आयुष मंत्रालय लवकरच मान्यता देण्याची शक्यता आहे.ओडिशा आणि छत्तीसगडसह देशाच्या अनेक भागांतील आदिवासी बांधव सर्दी-खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा आणि अन्य आजारांवर गुणकारी औषध म्हणून लाल मुंग्या आणि हिरव्या मिरचीचा समावेश असली चटणी खातात. त्यामुळेच आदिवासी भागात कोरोनाचा फारसा प्रसार झालेला नाही. त्याची दखल घेत नयाधर पाढीयाल यांनी सदर चटणीचा कोरोनावरील औषध म्हणून वापर करावा अशी मागणी केली होती. मात्र त्याला प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने पाढीयाल यांनी ओडिशा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने लाल मुंग्यांच्या चटणीचा कोरोनावरील औषध म्हणून वापर करण्यासाठी अभ्यास करून तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश  दिले आहेत. लाल मुंग्यांच्या चटणीमध्ये फॉर्मिक ऑसिड, प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी 12, झिंक आणि लोह मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे आजारी पडले की ओडिशा, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, मेघालय येथील आदिवासी बांधव ही चटणी खात असल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे नयाधर पाढीयाल यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post