राणेंनी अजित पवारांना पुन्हा डिवचले, तुमच्या लसीसाठी शरद पवार वशिला लावतील

 


राणेंनी अजित पवारांना पुन्हा डिवचले, तुमच्या लसीसाठी शरद पवार वशिला लावतीलमुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना लसीकरणाबाबत बोलताना परवानगी मिळाल्यानंतर मी लस घेईल असे वक्तव्य नुकतेच केले होते. आता या व्यक्तव्यावरुन भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पुन्हा एकदा पवारांना डिवचले असून खोचक टिप्पणी केली आहे. अजित पवारांना लस टोचून घ्यायची असेल तर शरद पवार त्यांच्यासाठी सिरम इन्स्टिट्युटमध्ये वशिला लावतील असा टोला राणेंनी लगावला आहे. निलेश राणे यांनी खोचक शैलीत ट्विट केले आहे. ‘‘कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा, असा सवाल निलेश राणे यांनी अजितदादांना विचारला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post