राम मंदिर निर्माणासाठी फक्त ‘यांच्या’कडूनच निधी संकलन करणार, विहिंपची भूमिका


राम मंदिर निर्माण निधीसाठी फक्त हिंदू परिवारांकडेच जाणार, विहिंपची भूमिका



नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशभरात देणगी जमा करण्यात येत आहे. यासाठी 15 जानेवारीपासून श्री राम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियान सुरु करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात 27 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. दरम्यान, श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच निधीसाठी संपर्क साधणार आहोत, असे वक्तव्य विहिंपचे प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी केले आहे. आम्ही फक्त राम भक्तांशीच संपर्क साधणार आहोत. विहिंपचे कार्यकर्ते सर्व ठिकाणी फिरतील पण इतर धर्मियांच्या घरी ते जाणार नाहीत. मात्र, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि इतर बांधवांनी जर स्वत:हून आमच्याशी संपर्क साधून निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यांच्या निधीचा आम्ही सन्मानाने स्वीकार करू, असंही तिवारी म्हणाले. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post