राज ठाकरे अयोध्येत जाणार, महाराष्ट्राचाही दौरा


राज ठाकरे अयोध्येत जाणार, महाराष्ट्राचाही दौरा  मुंबई  मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे अयोध्येत असतील, अशी माहिती मनसेने दिली आहे.  अयोध्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठीची रणनीती ठरवण्यासाठी मनसेची आज मुंबईमध्ये बैठक होत आहे, या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिल या कालावधीमध्ये मनसेची सदस्य नोंदणी होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post