राहुरी तालुक्यातील 82 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर...वाचा सविस्तर...
राहुरी - तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ४४ ग्रामपंचायतीच्या व संभावी ३८ ग्रामपंचायतीच्या अशा ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत उपविभागिय अधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षेतेखाली काढण्यात आली. यावेळी तहसिलदार फसियोदिन शेख,नायब तहसिलदार गणेश तळेकर यांनी आरक्षण सोडतीसाठी परिश्रम घेतले.यावेळी गटविकास अधिकारी गोंविद खामकर,कृषी अधिकारी महेश ठोकळे,दत्ता गोसावी,सुनिल हुडे,सयाजी,शंडगे,अभिजित क्षिरसागर,अश्विनी नन्नवरे, सुलोचना वाघमारे,महेश देशमुख,जावेद शेख,अंकुश सोनार अदि अधिकारी व कर्मचारी यांनी काम पाहिले.
राहुरी येथे आज बुधवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी११ वाजता केशरंग मंगल कार्यालय येथे सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी राहुरी तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडती पार पडल्या.आरक्षण पुढील प्रमाणे-
अनुसुचित जाती - ११ जागा पैकी
ताहाराबाद,कुकडवेढे,वांबोरी,चे
अनुसुचित जमाती-१० जागा
मालुंजे खुर्द, शिलेगाव, धानोरे,ब्राम्हणगाव भांड,उंबरे,महिला सरपंच राहणार आहे,
वरशिंदे(वाबळेवाडी),रामपुर,
नागराकांचा मागस प्रवर्ग-२२जागा पैकी सोनगाव,सडे,धामोरी खुर्द, वडनेर, मोमीन आखाडा, चिखलठाण दरडगाव थडी,टाकळीमिया,बाभुळगाव,कानडगाव ,डिग्रस,याजागेवर महिला सरपंच होणार आहेत.तर तुळापुर,पिंपळगाव फुनगी,आंबी, चादेगाव,चिंचविहिरे,कनगर बु,वावरथ जांभळी,जांभुळबन,पिप्री वळण,करजगाव,मोरवाडी,गणेगाव, या गावात नागराकांचा मागस प्रवर्ग सरपंच होणार आहे.
तर सात्रळ, निंभेर, तांदुळवाडी ,तांभेंरे, घोरपवाडी, बा.नांदुर ,कोंढवड, वरवंडी, खडांबे बुद्रुक, गुंजाळे संक्रापूर दवणगाव., केसापूर ,बोधेगाव लाख, पाथरे खुर्द ,कोपरे, तिळापुर सरपंचपद खुले आहे.
गुहा कुरणवाडी म्हैसगाव राहुरी खुर्द मानोरी देसवंडी तमनर आखाडा पिंपरी अवघड ब्राह्मणी मोकळ धामोरी, बुद्रुक आरडगाव चिंचोली गंगापूर अमळनेर ,जातप, माहेगाव ,वांजुळपोई ,कोल्हार खुर्द, येथे महिला सरपंच होणार आहे.
Post a Comment