टिळक महाराष्ट्राच्या कथ्थक पदविका परीक्षांमध्ये नगरची कु.पूर्वजा बोज्जा महाराष्ट्रात प्रथम

टिळक महाराष्ट्राच्या कथ्थक पदविका परीक्षांमध्ये नगरची कु.पूर्वजा  बोज्जा  महाराष्ट्रात प्रथम  महाराष्ट्रातील शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे घेण्यात येणाऱ्या कथक पदविका परीक्षेत अहमदनगरच्या कु. पूर्वजा बोज्जा ही महाराष्ट्र मध्ये विशेष गुणवत्तेसह प्रथम क्रमांक मिळवून यश मिळविले असल्याची माहिती कथक नृत्यलयाच्या संचालिका सौ. कल्याणी कामतकर यांनी सांगितले. त्यांच्या विद्यालयाच्या वतीने प्रारंभीक ते  पदविका या परीक्षेमध्ये सर्वच विद्यार्थिनींनी प्रथम वर्ग मिळवून उत्तीर्ण झाले असून कथक नृत्यालय, चा शंभर टक्के निकाल लागला आहे.

 सौ कल्याणी कामतकर या प्रसिद्ध नृत्यांगना सौ मनीषाताई सादये  यांच्या  शिष्या असून त्यांचे सावडी व नगर येथे गेल्या दहा वर्षापासून कथक नृत्यालयाचे वर्ग सुरू आहेत कथक नृत्य वरील प्रेम व अविरत मेहनत यामुळेच हे यश मिळाले असल्याची माहिती कामतकर यांनी दिली.


 नुकत्याच झालेल्या या परीक्षेत महाराष्ट्रातून एकूण 185 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातून कु.पूर्वजा बोज्जा हिस  मिळालेले हे यश नगरकरांसाठी आनंदायी आहे. व नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात भर घालणारी आहे.

 कु.पूर्वजा ही नगर शहरातील अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या शास्त्रीय नृत्याने मने जिंकली आहेत तिने शास्त्रीय संगीताचे धडे कथक नृत्यलया  च्या संचालिका सौ कल्याणी कामतकर यांच्याकडून घेतली आहे. तिचे प्राथमिक शिक्षण ओक्झि्लीयम  कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले असून सध्या ती  न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये बायोटेकचे प्रशिक्षण घेत आहे. पूर्वाजा ही अहमदनगर महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका सौ वीणाताई बोज्जा  व फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा  यांची कन्या आहे तिच्या या यशाबद्दल अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post