पुणे महानगरपालिकेत भाजपात बंडखोरीची चर्चा, अनेक नगरसेवक महाविकास आघाडीच्या संपर्कात

 


पुणे महानगरपालिकेत भाजपात बंडखोरीची चर्चा, अनेक नगरसेवक महाविकास आघाडीच्या संपर्कातपुणे : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीने आता आपला मोर्चा पुण्याकडे वळवला असून पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. महापालिकेत पदं न मिळाल्याने हे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे 19 नाराज नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेत मोठं यश मिळवलं होतं. मागील निवडणुकीत तब्बल 98  नगरसेवक निवडून आणत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली, या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि मनसेतून अनेक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता यातील काही नगरसेवक भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या चर्चांना अफवा असल्याचं सांगत खंडन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post