डॉ.दत्ताराम राठोड यांना अखेर अमरावती येथे नियुक्ती

डॉ.दत्ताराम राठोड यांना अखेर अमरावती येथे नियुक्ती नगर : नगरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना अचानक बदली करण्यात आलेले डॉ.दत्ताराम राठोड यांना मॅटच्या आदेशानुसार नियुक्ती देण्यात आली आहे. राठोड यांची अमरावती येथे नागरी हक्क संरक्षण पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने सदर आदेश जारी केले आहेत. नगरमध्ये नियुक्ती असताना एका कर्मचाऱ्याशी बोलताना त्यांची कथित ऑडिऒ क्लिप व्हायरल झाल्यानं ते चर्चेत आले होते. पण आता त्यांना गृह विभागाने अमरावतीला नियुक्ती दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post