सुदृढ पिढीसाठी प्लस पोलिओ चे लसीकरण यशस्वी करा
ना.सौ राजश्री घुलेजिल्हा रुग्णालयात पल्स पोलिओ चा शुभारंभ
अहनगर:- सुदृढ पिढिसाठी प्लस पोलिओ चे लसीकरण यशस्वी करा त्यामधूनच उद्याची सक्षम पिढी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना सौ राजश्री घुले यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग,व जिल्हा रुग्णालय यांचे विद्यमाने आयोजित पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शुभारंभ प्रसंगी केले यावेळी बोलताना सौ राजश्री घुले यांनी सांगितले की 2011 नंतर भारतात एकही पोलिओ चा एकही रुग्ण आढळलेला नाही ही आरोग्य विभागतील कर्मचाऱ्यांनी केलेली यशस्वी कामाची पावती आहे .या अभियानात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नवजात शिशु ,बालके यांची योग्य ती काळजी घेऊन लसीकरणाचे उद्दिष्ट वाडी वस्तीवर जाऊन वेळेत पूर्ण करावे .
कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन सौ घुले यांनी केले. ही लस साडेचार लाख बालकांना देण्यात येणार आहे
डॉ संदीप सांगळे म्हणाले की नगर जिल्ह्यामध्ये साडेचार लाख मुलांना आज व येणाऱ्या ग्रामीण भागामध्ये तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस हे लसीकरण देण्यात येणार आहे आरोग्य विभागाच्या वतीने या मोहिमेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे लस पुरवठा सर्व बुथ वर सर्व संस्थावर करण्यात आला आहे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झालेले आहे नगर जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार वीटभट्टीवर काम करणारे कामगार त्यांच्यासाठी खास मोबाईल टीम तयार करण्यात आली आहे
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुनील पोखरणा,,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष रेश्मा आठरे ,निवासी वैद्यकीय अधिकारी,डॉ संजीव डॉ. वेळंबे मनोज घुगे, ,डॉ दादासाहेब साळुंखे ,अधिसेविका श्रीमती व्ही आर गायकवाड,संदीप काळे, पंकज काळे आदी सह परिचारिका उपस्थित होते
Post a Comment