स्वयंरोजगाराची सुसंधी...प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे कार्यालयात प्रशिक्षण फॉर्म उपलब्ध

 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे कार्यालयात प्रशिक्षण फॉर्म उपलब्ध            अहमदनगर दि. 04 :- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना पीएमकेव्हीवाय 3.0 या योजनेची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता अहमदनगर जिल्हयामध्ये सीएससीएम आणि सीएसएसएम या दोन घटकांतर्गत 75:25 या प्रमाणात प्रशिक्षण द्यावयाचे असून प्रशिक्षणाकरीता पुढील कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

            सेल्फ एम्प्लॉईड टेलर, सॅम्पलिंग टेलर, सुविंग मशीन ऑपरेटर, फिल्ड टेक्निशियन कॉम्प्युटिंग ॲण्ड पेरीफेरल, ईन्स्टॉलेशन टेक्निशियन कॉम्प्युटिंग ॲण्ड पेरिफरल्स , फिल्ड टेक्निशियन नेटवर्किंग ॲण्ड स्टोरेज, फिल्‍ड टेक्निशियन ऑदर होम अप्लायंसेस, सीसीटीव्ही  इन्स्टॉलेशन टेक्निशियन आयटी को- ऑर्डिनेटर इन स्कूल, सोलार पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन, फिल्ड टेक्निशियन युपीएस ॲण्ड इन्व्हर्टर, मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन, कन्साईनमेंट बुकिंग असिस्टंट, वेअरहाऊस पॅकर, ब्युटी थेरपिस्ट, असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट, रिटेल सेल्स असोसिएट, मेडिकल सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर, डेअरी फॉर्मर, एन्टरप्रेनर.

            सदरचे प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-या उमेदवारांकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर या कार्यालयात प्रशिक्षण फॉर्म उपलब्ध असुन सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपस्थित राहून भरुन देण्यात यावा. असे आवाहन वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, अहमदनगर यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post