पंतप्रधान, मुख्यमंत्रीही घेणार करोना लस

पंतप्रधान, मुख्यमंत्रीही घेणार करोना लस नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस टोचून घेणार आहेत. देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यानंतरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लस टोकून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस दिली जाणार आहे. सामान्य लोकांमध्ये लसीबाबत विश्वास आणि जनजागृती पसरवण्यासाठी पंतप्रधान आणि इतर नेते लस टोचून घेणार आहे. लसीकरण मोहिमेची सुरुवात करताना मोदी म्हणाले होते की, दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाईल. यानुसार पंतप्रधान मोदीही लस घेणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post