आरक्षण जाहीर होताच पिंपळगाव माळवीत जल्लोष, सरपंचपदी राधिका संजय प्रभुणे यांची निवड निश्चित

 


आरक्षण जाहीर होताच पिंपळगाव माळवीत जल्लोष, सरपंचपदी राधिका संजय प्रभुणे यांची निवड निश्चितनगर : नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली असून पिंपळगाव माळवी येथील सरपंचपद अनुसुचित जाती महिला राखीव झालं आहे. त्यामुळे याठिकाणी सरपंचपदी राधिका संजय प्रभुणे यांची निवड निश्चित झाली आहे. आरक्षण सोडत जाहीर होताच गावात संजय प्रभुणे समर्थकांनी जल्लोष केला.  सरंपच निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यावर प्रभुणे यांची निवड अंतिम होईल. पिंपळगाव माळवी ग्रामपंचायतीत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, प्रतापराव झिने पाटील, देवराम शिंदे, सुभाष झिने, विश्वनाथ गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा पॅनलचे आठ सदस्य  निवडून आले होते. आता आरक्षण जाहीर झाल्यावर गावात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला. नियोजित सरपंच प्रभुणे यांनी येत्या पाच वर्षात गावाचा सर्वांगीण विकास साधण्याची ग्वाही दिली. यावेळी मजांबापू गोरक्षनाथ बेरड, मच्छिंद्र सोपान झिने, संतोष रामदास झिने, सुधिर विजय गायकवाड, रोहिणी हरिभाऊ घोरपडे, भारती सतिष बनकर, सुरेखा शिवाजी पुंड आदी नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post