प्रजासत्ताक दिनी देशवासियांना इंधन दरवाढीची झळ , पेट्रोल 93 प्लस

प्रजासत्ताक दिनी देशवासियांना इंधन दरवाढीची झळ मुंबई:  गेल्या तीन दिवसांपासून स्थिर असलेले इंधनाचे दर पुन्हा कडाडले आहे. मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुंबईत पेट्रोल 34 पैशाने तर डिझेल 37 पैशाने वाढले आहे. गेल्या महिन्याभरात ही पाचवी दरवाढ असून, पेट्रोल 92.62 रुपये झाले तर डिझेल 83.3 रुपये झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर कमी झाले असताना, देशात मात्र, एकाच महिन्यात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 18 आणि 19 जानेवारीला पेट्रोलच्या दरात तब्बल 48 पैसे तर डिझेल दरामध्ये 53 पैशांची वाढ झाली. त्यानंतर पुन्हा 22 आणि 23 जानेवारी या दोन दिवसांमध्ये पेट्रोल पुन्हा 48 पैसे आणि 53 पैशाने डिझेल वाढल्याने 18 जानेवारी पूर्वी असलेले पेट्रोलचे 91.32 रूपये प्रतिलीटर दर शनिवारी थेट 92.28 रूपयांवर तर डिझेल 81.6 रूपयांचा दर 82.66 रूपयांवर पोहचले होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post