मुख्याध्यापकाला झालेल्या मारहाणीचा निषेध

 मुख्याध्यापकाला झालेल्या मारहाणीचा

जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून निषेध

जिल्हाधिकार्यांना निवेदन     नगर - शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान नगर तालुक्यातील डोंगरणग येथील मतदान केंद्रावर  मते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत भुतकर यांना झालेल्या मारहाणीचा अहमदनगर जिल्हा माध्यमिक  उच्च माध्यमिक शाळा मुख्यापक संघाच्यावतीने  निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेयाप्रसंगी संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित  पदाधिकारी उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कीशुक्रवार दि.15 जानेवारी 2021 रोजी डांगरगणता.नगर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये डोंगरगण येथील मते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत काशिनाथ भुतकर हे आपल्या वयोवृद्ध अर्धांगवायू असलेल्या मातोश्रींना मतदानासाठी स्वत:च्या कारमध्ये घेऊन जात असतांना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मोहन बोरसे यांनी त्यांना कुठलीही चौकशी  करता अमानुषपणे बेदम मारहाण केलीश्रीभुतकर यांनी ड्युटीवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल यांची पूर्व परवानगी घेऊन मतदान केंद्रात प्रवेश केला होताही सर्व घटना पाहता पो.नि.मोहन बोरसे यांनी केलेले कृत्य हे निश्तिपणे निषेधार्थ असूनया कृत्याचा अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघ  शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने निषेध करण्यात येत असूनपोलिस निरिक्षक मोहन बोरसे यांची सखोल चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावीअसे निवेदात म्हटले आहे.

     या निवेदनावर संघाचे अध्यक्ष सुनिल पंडितभा.अं.रोहकलेभा.दं.सांगळेचंद्रकांत चौगुलेके.एल.हापसेदिपक रामदिनसुनिल गाडगेसखाराम गारुडकरदत्तात्रय गुंडसौ.आशा मगरडी.एम.रोकडेव्ही.एलगरडयशवंत भुतकरबापूसाहेब जगतापपी.एस.भुतकरएन.के.कदमजालिंदर शेळकेएस.केकेदारमहेंद्र हिंगेबाबासाहेब बोडखे आदिंच्या सह्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post