औरंगाबादच्या नामांतराचा वाद...ही तर कॉंग्रेस व शिवसेनेतील नूरा कुस्ती : देवेंद्र फडणवीस

 औरंगाबादच्या नामांतराचा वाद...ही तर कॉंग्रेस व शिवसेनेतील नूरा कुस्ती : देवेंद्र फडणवीसनागपूर : औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.  महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळेच शिवसेनेने पुन्हा एकदा नामांतराचा विषय समोर आणला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने औरंगाबादच्या संभाजीनगर या नामकरणाला विरोध केला काय किंवा नाही केला काय? शिवसेनेला हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता हवा असतो. असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post