पत्रकारांमुळेच सामाजीक दबाब टिकुन- प्रा . शशिकांत गाडे

 प्रा . शशिकांत गाडे : नगर तालुक्यातील पत्रकारांचा गौरव

पत्रकारांमुळेच सामाजीक दबाब टिकुन
केडगाव : समाजातील नकारात्मक  गोष्टी विरोधात नेहमीच आवाज उठवणाऱ्या पत्रकारांमुळेच सामाजीक स्वास्थ्य टिकुन राहते. नकारात्मक गोष्टी विरोधात पत्रकार सामाजीक दबाब निर्माण करतात . " असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा . शशिकांत गाडे यांनी केले .

पत्रकार दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते . प्रा . गाडे यांच्या हस्ते नगर तालुक्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला . यावेळी जि.प. सदस्य संदेश कार्ले , गोविंद मोकाटे , तालुकाप्रमुख राजेंद्र भगत ,उपतालुकाप्रमुख प्रकाश कुलट आदि उपस्थीत होते .

यावेळी गाडे म्हणाले की शेतकरी हितासाठी आम्ही नेहमीच संघर्षाची भूमिका घेतो . त्यास पत्रकारांची नेहमी साथ मिळत गेली .समाजात नकारात्मक गोष्टीमुळे सामाजीक स्वास्थ्य बिघडते . यासाठी वास्तववादी पत्रकारितेचा धाक कामी येतो . नगर तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना पत्रकारांनीच वाचा फोडली . यामुळे काही प्रश्न राज्यभर चर्चिले गेले .

यावेळी कार्ले मोकाटे भगत यांचेही भाषणे झाली .पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जितेंद्र निकम , अध्यक्ष योगेश गुंड माजी अध्यक्ष नितीन देशमुख व लहुकुमार चोभे , सचिव दत्ता इंगळे , कार्याध्यक्ष सुनील हारदे , उपाध्यक्ष शशिकांत पवार , खजिनदार ज्ञानदेव गोरे , सुनील चोभे , भाऊसाहेब होळकर ,नागेश सोनवणे , बाळासाहेब गदादे , संजय ठोंबरे , अविनाश निमसे आदि उपस्थीत होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post