नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी योगेश गुंड तर सचिवपदी दत्ता इंगळे


 

नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी योगेश गुंड तर सचिवपदी दत्ता इंगळे

 उपाधक्षपदी शशिकांत पवार तर खजिनदानपदी ज्ञानदेव गोरे यांची निवड


नगर : नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लोकमतचे तालुका प्रतिनिधी योगेश गुंड यांची तर सचिवपदी सकाळचे तालुका प्रतिनिधी दत्ता इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .नगर तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा मावळते अध्यक्ष व दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी जितेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . यात सर्वानुमते संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली . अध्यक्षपदासाठी योगेश गुंड यांच्या नावाची सुचना संस्थापक अध्यक्ष व पुढारीचे तालुका प्रतिनिधी नितीन देशमुख यांनी मांडली . त्यास पुण्यनगरीचे बाळासाहेब गदादे यांनी अनुमोदन दिले . सचिवपदी सकाळचे तालुका प्रतिनिधी दत्ता इंगळे यांच्या नावाची सुचना नगर दवंडीचे तालुका प्रतिनिधी अविनाश निमसे यांनी मांडली त्यास नगर स्वतंत्रचे उपसंपादक आदिनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले . यावेळी कार्याध्यक्षपदी नवामराठाचे उपसंपादक व जेष्ठ पत्रकार सुनील हारदे यांची व उपाध्यक्षपदी पुण्यनगरीचे शशिकांत पवार यांची तर पुढारीचे वार्ताहर ज्ञानदेव गोरे यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली . यावेळी नगर सह्याद्रीचे निवासी संपादक सुनील चोभे , पुण्यनगरीचे बाळासाहेब गदादे , पुढारीचे लहुकुमार चोभे , नगर दवंडीचे अविनाश निमसे , लोकमतचे नागेश सोनवणे व संजय ठोंबरे , नगर स्वतंत्र चे उपसंपादक आदिनाथ शिंदे आदि उपस्थीत होते . नविन कार्यकारिणीचे नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के , पुण्यनगरीचे निवासी संपादक राजेंद्र झोंड , लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, पुढारीचे जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर निमसे , प्रभातचे संपादक विठ्ठल  लांडगे, सकाळचे उपसंपादक मुरलीधर कराळे , समाचारचे उपसंपादक भाऊसाहेब होळकर , पुढारीचे उपसंपादक गोरखनाथ बांदल आदिंनी अभिनंदन केले आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post