नगर-शिर्डी रस्त्याचे भाग्य उजळणार, 500 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी
खा.डॉ.सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश
नगर : अहमदनगर ते शिर्डी रस्त्याच्या निर्मितीसाठी 500 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. येत्या आठवड्यात या कामाचे टेंडर निघणार असून मार्च महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे, अशी माहिती खा.डॉ.सुजय विखे यांनी दिली. डॉ.विखे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच या रस्त्याच्या कामासाठी भेट घेतली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या अहमदनगर ते शिर्डी रस्त्याला मंजुरी मिळालेली आहे. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया मार्फत या रस्त्याची निर्मिती केली जाणार आहे. अवजड वाहतुकीमुळे वारंवार खराब होणारा हा रस्ता टिकून राहावा यासाठी 70 टक्के रस्ता कॉंक्रीटचा असणार आहे. जलदगतीने निर्णय घेऊन या रस्त्याला मंजुरी दिल्याबद्दल डॉ.विखे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
Post a Comment