ऐतिहासिक वस्तू संग्रहालय १५ जानेवारी पासून खुले

 राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी साहेबांकडून अभिवादननगर प्रतिनिधी – १२ जानेवारी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याकडून ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्रातील राजमाता जिजाऊ व स्वराज्य संकल्पक राजे शहाजी भोसले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जिल्हाधिकारी भोसले यांनी अभिवादन केले. त्याच बरोबर संग्रहालयाची पाहणी केली. रेनोव्हेशनच्या कामाचा आढावा घेतला. अहमदनगर संग्रहालय कोविड – १९ मुळे बंद होते ते १५ जानेवारी पासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. अहमदनगर महापालिकेचे महापौर श्री. बाबासाहेब वाकळे यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी व महापौर यांचा सत्कार अहमदनगर संग्रहालयातर्फे डॉ. यादव यांनी केला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री.नंदकुमार यन्नम यांनी जिल्हाधिकारी यांचे काढलेले पेन्सिल स्केच यावेळी डॉ. यादव यांनी जिल्हाधिकार्यांना भेट म्हणून दिले. यावेळी श्री. नारायणराव आव्हाड, आनंद कल्याण, राहुल भोर, बापू मोढवे, रामदास ससे, गणेश रणसिंग आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post