दुप्पट पैशाच्या आमिषाला भुलले व कोट्यवधी गमावले, पोलिसांत तक्रार दाखल

 दुप्पट पैशाच्या आमिषाला भुलले व कोट्यवधी गमावले, पोलिसांत तक्रार दाखलनगर : वर्षभरात गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट करून देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्यांना अखेर पोलिस स्टेशन गाठावे लागले आहे. नेवासा तालुक्यातील सोनई व परिसरात चार संस्थांची नावे घेत एका वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेक लाभधारकांना सहा कोटी  81 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी अण्णासाहेब मिठ्ठू दरंदले (रा. सोनई) यांनी ही फिर्याद दिली आहे. त्यानुसार विष्णू रामचंद्र भागवत (रा. दवंडगाव, जि. नाशिक), निलेश जर्नादन कुंभार (रा. मंचर, जि. पुणे), सुरेश सीताराम घंगाडे (रा. तळेगाव, जि. पुणे), राजेंद्र वामन देशमुख, प्रवीण गंगाधर कवडे (रा. कोतूळ, ता. अकोले), शांताराम अशोक देवतरसे (रा. सोनई, ता. नेवासा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुळा कारखाना परिसरातील अंजनी हॉटेल, संकेत हॉटेल (आळेफाटा) व शिर्डी येथे बैठक घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे आमिष दाखविण्यात आले. विमान प्रवास सहल, जमिनीचे आश्वासन देण्यात आले. सलग दोन अडीच वर्षे असे पैसे जमा केल्यावर पैसे परत करायची वेळ आल्यावर संबंधितांनी हात वर केले. त्यामुळे अखेर फसवणूक झालेल्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post