मोठी बातमी...राज्यात पाचवी ते आठवीचे वर्गही सुरु होणार

 राज्यात पाचवी ते आठवीचे वर्गही सुरु होणार, शिक्षण विभागाकडून नियोजनमुंबई : कोरोनाच्या संकटातही मुलांची शिक्षणातील गोडी कायम राहावी, शिक्षणाच्या प्रवाहातून मुले- मुले बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. भाषा विषयातील स्वाध्याय उपक्रमातून, दिक्षा ऍपच्या माध्यमातून, गुगल, गृहभेटी, सह्याद्री, दूरदर्शनसह अन्य ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जात आहे. परंतु, ज्यांच्याकडे काहीच साधने नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा हाच पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर नववी ते बारावीनंतर आता 12 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन आहे. राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून 12 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. शाळा सुरु केल्यानंतर मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना त्याठिकाणी केल्या जाणार असून जेणेकरुन पालकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल, यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात राज्यभर आदेश पारित केले जाणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post