मावा विक्रेत्यांवर एलसीबीची कारवाई, सुमारे 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
नगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगावमधील मुख्य चौकात मावा विक्री करणार्या सहा जणांविरुध्द कारवाई करीत 34 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पो.कॉं. विनोद मासाळकर यांच्या फिर्यादीवरुन सहा जणाविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी चौक, क्रांती चौक व आंबेडकर चौकात मावा विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली. यात असिफ मोहम्मद शेख, सय्यद जुनेद जावेद, अस्लम सत्तार पठाण, शाकीर मोहम्मद शेख, जय नारायण पवार, आकाश अशोक चव्हाण या आरोपींचा समावेश आहे. त्यांच्याकडून सुगंधी तंबाखू, सुपारीपासून तयार केलेला मावा, सुपारी चुरा असे साहीत्य जप्त केले आहे. या कारवाईत पो.कॉं.विनोद मासाळकर, संतोष लोढे, राहुल सोळुके, रोहीदास नवगिरे व प्रकाश वाघ यांनी सहभाग घेतला.
Post a Comment