आजारी चुलत्यांना रस्त्याकडेला बसवून तो धावला अपघातग्रस्तांच्या मदतीला

 आजारी चुलत्यांना रस्त्याकडेला बसवून तो धावला अपघातग्रस्तांच्या मदतीलाआपण प्रवास करीत असताना वाटेत अपघात घडला असेल तर हळहळतो आणि पुढे निघून जातो . नको ती झंझट , उगाच वेळ वाया जाईल , असं कारण आपल्याकडे तयार असतात . परंतु सर्वच लोक असा विचार नाही करीत . सोनईतील युवकाने जपलेल्या बांधिलकीमुळे त्याचे कौतुक होतंय .


सोनई येथील युवक अपघातात जखमी झालेल्या चुलत्यांना घेऊन रूग्णालयात निघाला होता . प्रवासात त्याला अपघात झाल्याचे दिसले . तो पुढे न जाता तिथेच थांबला . हेही वाचा - मंत्री गडाखाचा प्रचारात विकासाचा नारा सामाजिक कार्यकर्ते सुभाष राख यांचा मुलगा अभिजीत आपले चुलते अशोक राख यांना नगर येथील रुग्णालयात मोटारसायकलवर घेवून चालले होते.नगर - औरंगाबाद रस्त्यावरील शिंगवे तुकाई हद्दीत पोचताच त्यांना वीज उपकेंद्रासमोर बस आणि मालवाहतूक ट्रकचा अपघात दिसला . बसमधील जखमींना मदतीची गरज लक्षात घेवून त्यांनी जखमी चुलत्यांना रस्त्याकडेला बसवून बसमधील जखमींना मदत केली . सर्वप्रथम शनैश्वर देवस्थान व १०८ रुग्णवाहिका व पोलिस ठाण्यास संपर्क केला . नंतर उपस्थितांच्या मदतीने बसमधील सात जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पोच केले . त्यानंतर चुलत्यांना रूग्णालयात नेलं या युवकाचे ग्रामस्थ व प्रवाशांनी कौतुक केले . बसचालक विजय ठोमणे यांच्या फिर्यादीवरुन सोनई पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post