खर्डा ग्रामपंचायतीत आ.रोहित पवारांची माजी मंत्री राम शिंदेंवर मात

 खर्डा ग्रामपंचायतीत आ.रोहित पवारांची माजी मंत्री राम शिंदेंवर मातनगर : जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत आ.रोहित पवार यांनी बाजी मारली असून भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांच्या ताब्यातून खर्डा ग्रामपंचायतीची सत्ता हिसकावून घेतली आहे. संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागले होते. राष्ट्रवादीने या निवडणुकीत 11 जागांवर विजय मिळवला तर भाजपला फक्त 6 जागांवर समाधान मानावे लागले. जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आ.रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले होते. खर्डा ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत ताब्यात आल्याने आ.पवार यांचे वर्चस्व वाढले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post