कार्यालयात उशिरा आल्यास मिळणार 'या' शिक्षा

 लेट लतीफ कर्मचाऱ्यांना आवर घालण्यासाठी नवी नियमावली



मुंबई:  आता कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. यानुसार उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापण्यापासून ते त्यांच्या सुट्ट्या कापण्यापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार एका महिन्यात तीनपेक्षा अधिक दिवस कामावर उशिराने पोहोचल्यास एक दिवसाची सुट्टी कापली जाईल. तसेच महिन्यातून 9 पेक्षा अधिक वेळा कामावर उशिरा आल्यास कर्मचाऱ्याला महिन्याला मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये कपात केली जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांकडे महिन्यांच्या सुट्ट्या शिल्लक नाहीत आणि तरीही ते उशिरा कार्यालयात येत असतील तर त्या हिशोबाने त्यांचा पगार कापला जाणार आहे. या शिवाय ज्या अधिकाऱ्यांना सुट्ट्या कापू नये असे वाटते ते अधिकारी जर दोनपेक्षा अधिक दिवस एक किंवा दीड तास उशिराने ऑफिसात आले तर त्यांना उशिरापर्यंत कार्यालयात काम करावं लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post