ग्रामसेवकांनी शासकीय योजनांच्या लाथार्थींमध्ये पांडुरंगाला पाहून त्याची सेवा करावी : राजेंद्र क्षीरसागर

 ग्रामसेवकांनी शासकीय योजनांच्या लाथार्थींमध्ये पांडुरंगाला पाहून त्याची सेवा करावी : राजेंद्र क्षीरसागर

अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच वाढीव कर्जमर्यादेनुसार धनादेशांचे वितरणनगर : प्रत्येकाच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता असेल तर तो आपले काम अधिक चांगल्याप्रकारे करू शकतो. अशी आर्थिक स्थिरता सभासदांना मिळवून देण्याचे काम ग्रामसेवक पतसंस्था करीत आहे. 21 लाखापर्यंत कर्ज, ठेवीवर जवळपास दहा टक्के व्याज अशा योजना राबविणारे पतसंस्थेचे नेतृत्त्व कौतुकास पात्र आहेत. ग्रामसेवकांना असे आर्थिक पाठबळ मिळत असल्याने तो अधिक सक्षमतेने कर्तव्य बजावू शकतो. आपल्याकडे ग्रामीण भागात विकासाचा दूत म्हणून ग्रामसेवकांचे स्थान आहे. त्यांनी शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये पांडुरंग पाहून त्यांची सेवा केली पाहिजे. नगर जिल्ह्यात शासकीय योजनांची अतिशय प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामसेवकांनी सातत्याने प्रयत्नशील रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले.

अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या सन 2021 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच वाढीव सर्वसाधारण कर्ज मर्यादेनुसार सभासदांना कर्जाच्या धनादेशाचे वितरण नववर्षदिनी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना क्षीरसागर बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष तथा संस्थेचे मानद सचिव एकनाथ ढाकणे, संस्थेचे चेअरमन विजयकुमार बनाते, व्हा.चेअरमन शितल पेरणे-खाडे, संचालक रामदास डुबे, सुनिल नागरे, राजेंद्र पावसे, संजय घुगे, मधुकर जाधव, नवनाथ पाखरे, मंगेशकुमार पुंड, विलास काकडे, रखमाजी लांडे, एकनाथ आंधळे, रमेश बांगर, नारायण घेरडे, महेश जगताप, सचिन मोकाशी, विशाल काळे, डॉ.धर्माजी फोफसे, अभय सोनवणे, रोहिणी नवले, सभासद अशोक नरसाळे, युवराज पाटील, तात्यासाहेब ढोबे, दादा भिंगारदे, अरूण जेजरकर, बाळासाहेब कडू आदी उपस्थित होते.

अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर म्हणाले की, भौगोलिक दृष्ट्‌या सर्वात मोठा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्यात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात ग्रामसेवकांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे. नरेगा, शौचालय उभारणी अशा अनेक कामांत जिल्ह्याने आदर्श काम केले आहे. सलग तीन वर्ष जिल्ह्याने उत्कृष्ट कामासाठी पुरस्कारही मिळवला आहे. यात ग्रामसेवकांच्या कामाचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामसेवकांच्या पतसंस्थेचे कामही अतिशय उत्कृष्ट व शिस्तबध्द असून सभासदांचे हित साधणारा कारभार याठिकाणी होतो, हे कौतुकास्पद आहे.

प्रास्ताविकात एकनाथ ढाकणे यांनी सांगितले की, संस्थेने नुकतेच सुवर्णमहोत्सवी वर्षे साजरे केले आहे. संस्थेने सर्वसाधारण कर्ज मर्यादा 21 लाखापर्यंत नेली आहे. ग्रामसेवक परिवार योजनेअंतर्गत सभासदाचे मृत्युनंतर त्याच्या वारसास 5 लाख रुपये तातडीची मदत देण्यात येते, विवाह भेट योजनेअंतर्गत सभासदाच्या पाल्याच्या विवाहावेळी 5 हजार 1 रुपयांची भेट दिली जाते. एक जानेवारी 2021 पासून 3 लाखापर्यंतचे कर्ज वितरण फक्त 6 टक्के व्याजदराने केले जात आहे. सभासदांना 15 लाख रुपये अपघात विमा संरक्षणही दिले जाते तसेच दरवर्षी मुदतीत आमसभा घेवून 15 टक्के दराने लाभांश वाटप केला जातो. संस्थेची स्वमालकीची सुसज्ज इमारत असून ग्रामसेवक मार्गदर्शन केंद्रही कार्यान्वीत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे सभासदांना बँकिंग सेवा दिली जाते. सभासदांच्या पाल्यांचा वार्षिक सभेत गौरव करून त्यांना प्रोत्साहनपर बक्षिस दिले जाते. ग्रामसेवकांना त्यांच्या विहित कर्तव्यासाठीही नेहमी प्रेरित केले जाते. आताच्या महाआवास सारख्या योजनेतही जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसेवक झोकून देवून काम करेल, अशी ग्वाही ढाकणे यांनी दिली. स्वागत व सूत्रसंचालन चेअरमन विजयकुमार बनाते यांनी केले. आभार राजेंद्र पावसे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post