पाथर्डीतील आयुब उस्मान सय्यद खून प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

 पाथर्डीतील आयुब उस्मान सय्यद खून प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षानगर : पाथर्डीतील आयुब उस्मान सय्यद खून प्रकरणात न्यायालयाने आरोपी समद सालार सय्यद (वय 23, रा.जानपीरबाबा दर्गाशेजारी, पाथर्डी) यास दोषी ठरवत आजन्म कारावासाची व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दुसरा आरोपी शकूर सालार सय्यद (वय 22, रा.जानपीरबाबा दर्गाशेजारी, पाथर्डी) यास सहा महिने सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश क्र.8 श्री.एम.आर.नातू यांनी या खटल्याचा निकाल दिला.

मयत आयुब उस्मान सय्यद व त्यांचा भाया गफुर उस्मान सय्यद हे शेजारीशेजारी राहत होते. त्यंच्यामध्ये जानपीरबाबा दर्गा येथे पूजा करण्यावरुन नेहमी वाद होत असत. दि.24 जुलै 2018 रोजी मयताच्या घरासमोर आरोपींनी धुडगुस घातला व आयुब उस्मान सय्यद यांच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. यावेळी आयुब उस्मान सय्यद यांच्या पत्नीने आरडोओरड केल्यावर आरोपी पळून गेले. दरम्यान जखमी सय्यद यांना पाथर्डीतील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील केदार गोविंद केसकर यांनी एकूण 5 साक्षीदार तपासले. साक्षीपुरावा, कागदोपत्री पुरावा तसेच सरकारी वकील केदार केसकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी पोहेकॉ बी.बी.बांदल, पोकॉ पांडुरंग पाटील, पोहेकॉ नंदकिशोर सांगळे, एएसआय कादिश यांनी सहाय्य केले. सदर प्रकरणात जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील यांनी केसकर यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post