धक्कादायक अहमदनगर जिल्ह्यात आढळला मुंडके नसलेल्या लहान मुलासह महीलेचा मृतदेह

 धक्कादायक अहमदनगर जिल्ह्यात आढळला मुंडके नसलेल्या लहान मुलासह महीलेचा मृतदेह 
शेवगाव ..संदिप देहाडराय-  शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. यातील विशेष म्हणजे या मृतदेहाचे मुंडकेच कोणीतरी कापून घेवून गेले आहे.

तसेच तेथेच एका 10 ते 15 वर्षीय मुलाचाही मृतदेह आढळून आला. मुंडके नसलेला महिलेचा व लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्यात कोणीतरी फोन करून माहिती दिली की, पाथर्डी रोडवर असलेल्या आयटीआय लगत मोकळ्या जागेत एक महिला मृत्यूमुखी पडली आहे. अशी माहिती समजताच शेवगाव पोलिस ठाण्याचे सपोनि. विश्वास पावरा, सपोनि. सुजीत ठाकरे, पोना. रवी शेळके, सुधाकर दराडे, अच्यूत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पोलिस पथकाने तेथे पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी पाहणी केली असता एक 60 वर्षीय महिला मृतावस्थेत आढळून आली. विशेष म्हणजे या मृतदेहाला मुंडकेच नव्हते. पोलिसांनी आसपास तपास केला मात्र मुंडके आढळून आले नाही. मात्र तेथे आणखी एक 10 ते 15 वर्षील मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याचपमाणे या महिलेल्या मृतदेहाशेजारी भांडी, पेटी, गोणपाट, काड्याकुड्या असे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
मृतदेहाला मुंडके नसल्याने ओळख पटविणे अवघड बनले आहे. यामुळे पोलिसांनी नगर येथील श्वान पथकाला पाचारण केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post