डॉ.हेडगेवार शैक्षणिक संकुलात मोफत हॉटेल मॅनेजमेंट कोर्स

 डॉ.हेडगेवार शैक्षणिक संकुलात मोफत हॉटेल मॅनेजमेंट कोर्सनगर : केडगावमधील विद्या प्रतिष्ठानच्या डॉ.हेडगेवार शैक्षणिक संकुलात भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्य मोफत हॉटेल मॅनेजमेंट कोर्सचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. याशिवाय इंग्लिश स्पिकिंग व स्पर्धा परीक्षा कोर्सचेही उद्‌‌‌घाटन करण्यात आले. हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी मोफत प्रवेश असून वार्षिक 30 हजार रुपये स्टायपेंड, प्रमाणपत्र व नोकरी, व्यवसायाच्या संधीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा सेंटरचे प्रमुख राजेश परदेशी यांनी यावेळी दिली.
या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादाराम ढवाण, संस्थेचे कोषाध्यक्ष अरूण धर्माधिकारी, संस्थेचे सहकार्यावाह ऍड.मुरलीधर पवार, विश्वस्त दत्ताजी जगताप, सतिश झिकरे, दादासाहेब काजळे, ज्ञानेश्वर अंदुरे, शेवगावकर, धर्माधिकारी मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.रवींद्र चोभे यांनी केले. पुणे येथील धनश्री मल्टीसर्व्हिसेसचे डायरेक्टर दीपक काळे यांनी तीनही कोर्सबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. योग प्रशिक्षक मारुती चोभे यांनी आपल्या मातोश्री लक्ष्मीबाई चोभे यांच्या स्मरणार्थ डॉ.हेडगेवार शैक्षणिक संकुलास पाच हजारांची देणगी दिली तसेच उपस्थितांना योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षणप्रेमी बाळासाहेब रघुनाथ लाटे यांनी मातोश्री स्व.रूख्मिनीबाई लाटे यांच्या स्मरणार्थ सरस्वती प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एसएससी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम आलेल्या रोशन शिंदे या विद्यार्थ्यास 4 हजार रुपये तर विद्यार्थिनीत प्रथम आलेल्या शुभांगी कोळेकर हिला 4 हजारांचा धनादेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता क्षीरसागर व स्मिता खिलारी यांनी केलं. मुख्याध्यापक संदीप भोर यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post