सदिच्छा मंडळात फूट 'यांनी' केला गुरुमाऊली मंडळात प्रवेश

 जिल्हा सदिच्छा मंडळात फूट 'यांनी' केला गुरुमाऊली मंडळात प्रवेश


 गोकुळ कळमकरांसह अनेकांचा गुरुमाऊली मंडळात  प्रवेश...
अहमदनगर (प्रतिनिधी) शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व सदिच्छा मंडळाचे नेते गोकुळ कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील सदिच्छा मंडळाचे विविध तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी सर्वश्री. कारभारी बाबर ,यादव सिनारे, गौतम साळवे ,कैलास शिंदे, रवींद्र रोकडे, छाया पवार, प्रज्ञा भोसले, मीनाक्षी अवचरे, अश्फाक शेख, केरु डोके, अजय सोनवणे संतोष मगर, दत्ता लामखडे, रामकृष्ण मेहेत्रे, अरुण फंड, संतोष मगर, राजू आतार आदिनी आज बापूसाहेब तांबे प्रणित गुरुमाऊली मंडळात प्रवेश केल्याने जिल्ह्यामध्ये सदिच्छा मंडळाला मोठे भगदाड पडले आहे..

शिक्षक बँकेच्या सभागृहात झालेल्या गुरुमाऊली मंडळाच्या आमसभेत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस आप्पासाहेब कुल हे होते. यावेळी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, शिक्षक बँकेचे चेअरमन राजू राहणे, व्हाईस चेअरमन उषाताई बनकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे, संदीप मोटे, पीडी सोनवणे, राजू साळवे,मोहनराव पागिरे, शकिल बागवान यांच्यासह शिक्षक बँकेचे सर्व संचालक, शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. बँकेचे सभागृह गर्दीने फुलून गेले होते..

याप्रसंगी बोलताना गोकुळ कळमकर यांनी 25 वर्षे सदिच्छा मंडळांमध्ये काम केलं. ते सोडताना अतिशय दुःख होत आहे असे सांगून सदिच्छा मंडळाची सूत्रे सर्व संघटना फिरून आलेल्या व्यक्तीच्या हाती गेली असून त्यांच्या मनमानीने सदिच्छा मंडळ संपण्याची वेळ आली आहे. बँकेच्या एका माजी चेअरमनने स्वतःवर अन्याय झाला असे ओरडून ओरडून सांगितले आणि स्वतः पदे भूषवली. सर्व काही मला मिळाले पाहिजे. ईतरांना  मिळता कामा नये ही त्यांची भूमिका होती. त्यांच्या सर्व प्रश्नांना आम्ही खंबीरपणे उत्तर दिले .शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कारभार अतिशय चांगला चालू असून बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा गुरुमाऊली मंडळच बँकेमध्ये निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..

जिल्हा संघाचे व गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी आपल्या मनोगतामध्ये बँकेचे संचालक मंडळ अतिशय काटकसरीने कारभार करीत असून दोन टक्केच्या फरकाने हा कारभार राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. सातारा बँकेच्या निवडणुकीमध्ये नगर बँकेचे उदाहरण दिले जात आहे .यावर्षीदेखील सभासदांना लाभांश समाधानकारक देण्यात येईल. कर्जाचा व्याजदर कमी करण्याच्या मागणी बाबत संचालक मंडळ निश्चित विचार करेल असे सांगितले...

कार्यक्रमाचे अध्यक्षआप्पासाहेब कुल यांनी राज्य संघ बापूसाहेब तांबे यांच्या मागे भक्कमपणे उभा असून जिल्हा संघाच्या निवडीचे व त्रैवार्षिक घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. जिल्ह्याच्या त्रैवार्षिक ची तारीख ठरवा. संपूर्ण राज्य संघ त्या ठिकाणी उपस्थित राहील असे सांगून राज्यातील शिक्षकांच्या बदली धोरणाचा मसुदा ग्रामविकास खात्याने तयार केला असून नजिकच्या काळामध्ये तो आपल्याला प्राप्त होणार आहे. त्या बाबत अभ्यासू लोकांनी आपल्या सूचना संघटनेकडे द्याव्यात. एकत्रितपणे अभ्यास करून सर्वांच्या सोयीचा बदली जीआर काढण्यासाठी आपण राज्य संघामार्फत राज्य शासनास भाग पाडू असे सांगितले..

 यावेळी आबासाहेब दळवी, साहेबराव अनाप, अजय सोनवणे, गौतम साळवे, मीनाक्षी अवसरे, राजू साळवे, सलीमखान पठाण आदींनी आपलं मनोगत व्यक्त केले..

कार्यक्रमास शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शरद सुद्रिक, संतोष दुसुंगे, बाळासाहेब मुखेकर,अर्जुन शिरसाट, किसन खेमनर, बाबा खरात, राजेंद्र सदगीर, पी डी सोनवणे,भाऊराव राहिंज,राम वाकचौरे, संदीप मोटे,बाळू कापसे, विजय नरवडे, रामेश्वर चोपडे, सुनील गायकवाड, किशोर माकोडे, पांडुरंग खराडे , शशिकांत जेजुरकर,ज्ञानेश्वर शिरसाट, रमेश गोरे, संतोष राऊत, किसन वराट, आदिनाथ सातपुते, आर टी साबळे, विश्वस्त रमेश धोंगडे, बाळासाहेब सालके,सरदार पटेल, अण्णासाहेब आभाळे,महेश भणभणे, संतोष वाघमोडे, शाम पटारे, शिवाजी भालेराव, राजू इनामदार, संतोष साबळे, शुभांगी निकम, कल्पना पडवळ, सुरेखा पावडे, अनिता दिघे, वंदना असणे,चंद्रकांत धामणे, गणेश भोसले, संतोष बारगळ, नंदकुमार आवटी,रंजीत खताळ, अंजली मुळे ,गीता बाप्ते, सूर्यकांत काळे, सुरेश निवडूंगे आदिंसह जिल्हाभरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश खिलारी यांनी केले तर आभार राजू राहणे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post