आरक्षण जाहीर होताच गुणवडीत जल्लोष,सरपंचपदी रंजना शाम साळवे यांची निवड निश्चित!
नगर : नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली असून गुणवडी येथील सरपंच पद अनुसूचित जाती व्यक्ती राखीव झाले आहे,त्यामुळे या ठिकाणी सरपंच पदी रंजना शाम साळवे यांची निवड निश्चित झाली आहे,आरक्षण सोडत जाहीर होताच गावात समर्थकांनी जल्लोष केला.सरपंच निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यावर साळवे यांची निवड अंतिम होईल.गुणवडी ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी पॅनल यांच्या मार्गदशनखाली नऊ पैकी सहा सदस्य निवडून आले होते आता आरक्षण जाहीर झाल्यावर गावात गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.नियोजित सरपंच साळवे यांनी येत्या पाच वर्षात गावाचा सर्वांगीण विकास साधण्याची आश्वासन दिले.ह्यावेळी मा.सरपंच वाल्मिक नागवडे,मा सरपंच .महेंद्र शेळके,मा.चेअरमण योगेश शेळके, रणजित कुटे,विलास शेळके,दत्तात्रय कुटे,डॉ.नितीन शेळके, मे.बाळासाहेब शेळके,सूर्यभान नागवडे आदी व नवनिर्वाचित सदस्य उपस्थीत होते.
Post a Comment