दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना चक्क राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा पाठिंबा

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांप्रती राज्य सरकारी कर्मचार्‍यांनीही दाखवली बांधिलकी

 


अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी बांधवांप्रती बांधिलकी दर्शवित देशात सरकारी कर्मचार्‍यांच्या वतीने गुरुवारी (दि.21 जानेवारी) एकजुट दिवस पाळण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने एकजुट दिनानिमित्त शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आंदोलक शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, भाऊसाहेब डमाळे, कैलास साळूंके, पुरुषोत्तम आडेप आदी उपस्थित होते.    

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यापासून अन्नदाता शेतकर्‍यांचे नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. केंद्र शासनाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे यावर तोडगा निघण्यास तयार नाही. केंद्र सरकारसोबत शेतकरी नेत्यांचा आतापर्यंत नऊ अनिर्णीत चर्चांच्या फेर्‍या पार पडल्या. सर्व आंदोलक देशातील शेतकरी असल्याचे सरकारने मान्य केले असले तरी सरकार फक्त आंदोलकांना चर्चेसाठी बोलावत असून, यावर मार्ग काढला जात नाही. शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी समाधानकारक ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. थंडी, ऊन, वारा व पाऊसात जीवाची पर्वा न करता शेतकर्‍यांनी हे आंदोलन सुरु ठेवले आहे. यामध्ये शेतकरी पुरुष महिला व त्यांचे कुटुंबीय देखील उतरले आहेत. देशात हे विदारक चित्र असून, शेतकर्‍यांप्रती सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन सरकारी कर्मचारी त्यांना एकजुटीने पाठिंबा दर्शवीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post